Tokyo Olympic – बॉक्सिंग सामन्यात भयंकर घटना, बॉक्सिंगपटूने केला प्रतिस्पर्ध्याचा कान चावण्याचा प्रयत्न

Photo Courtsey www.stuff.co.nz

बॉक्सिंगच्या सामन्यादरम्यान माईक टायसन याने प्रतिस्पर्धी इव्हांडर होलीफिल्ड याच्या कानाचा चावा घेत तुकडा पाडला होता. या बदनाम प्रसंगाची आठवण करून देणारी घटना टोकियो इथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत घडली आहे. मोरोक्कोचा मुष्टीयुद्धपटू युनूस बाल्ला याने न्यूझीलंडचा मुष्टीयुद्धपटू डेव्हीड नायकाच्या कानाचा चावा घेण्याचा प्रयत्न केला.

Photo Courtsey - BBC
Photo Courtsey – BBC

बाल्लाने चावण्याचा प्रयत्न करताच न्यूझीलंडचा मुष्टीयुद्धपटू डेव्हीड नायकाने पंचांकडे याबाबतची तक्रार केली. तक्रारीनंतरही पंचांनी सामना थांबवला नाही आणि बाल्लाला खेळण्यास परवानगी मिळाली. हा सामना नायकानेच जिंकला. विजयानंतर त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की ‘बाल्लाला कळालं होतं की तो जिंकू शकत नाही. त्यामुळे त्याने माझ्या कानाला चावण्याचा प्रयत्न केला.’ नायका पुढे गंमतीने म्हणाला की ‘या प्रयत्नात त्याचं तोंड गोड झालं असेल.’

आपली प्रतिक्रिया द्या