मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पगल्या’ची छाप

मराठी चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत आपली छाप उमटवत आहेत. या यादीत आता ‘पगल्या’ या चित्रपटाचादेखील समावेश झाला आहे. ‘पगल्या’ ने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड’ पटकावला आहे. एका शॉर्ट फिल्मसाठी डॉ. सुनील खराडे यांनी ही पटकथा लिहिली होती. मात्र, कथा लिहिल्यानंतर त्यांना या कथेवर चांगला चित्रपट होऊ शकतो असे वाटले.

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात, ‘या मराठी चित्रपटाच्या कथेला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जिंकणे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूपच अभिमानास्पद आहे.’ या चित्रपटात वृषभ आणि दत्ता या मुलांची गोष्ट आहे.

लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱया त्यांच्या निरागस भावना यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट इटली, अमेरिका, यूके आणि स्वीडन या देशातील 19 चित्रपट महोत्सवातदेखील याची निवड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या