मॉस्किटो कॉईलमुळे तरुणाचा जळून मृत्यू

59
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंब्रा

मच्छरांना पळवून लावण्यासाठी जर तुम्ही मॉस्किटो कॉईलचा वापर करत असाल तर थांबा. या मॉस्किटो कॉईलमुळे मुंब्र्यांतील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. नजमुद्दीन खान असे या तरुणाचे नाव असून तो भंगार व्यावसायिक होता. मच्छरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी लावलेल्या मॉस्किटो कॉईलमुळे लागलेल्या आगीत हा तरुण मृत्युमुखी पडला.

ठाण्यातील कोसा परिसरात नजमुद्दीन खान शनिवारी रात्री कामावरून घरी परतला. झोपण्याच्या वेळी त्याने मच्छरांपासून बचावासाठी नजमुद्दीनने मॉस्किटो कॉईल लावली आणि झोपून गेला. मध्यरात्रीच्या सुमारास कॉईलमुळे घराला आग लागली.

घराला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवले आणि या दुर्घटनेत भाजलेल्या नजमुद्दीनला कळव्यातील छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण सोमवारी उपचारादरम्यान नजमुद्दीनचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या