जगातील पाच धोकादायक विमानतळ

222

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

विमानात बसण्याची भिती वाटणं ही तशी साधारण गोष्ट आहे. यावरून आपण आपल्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईंकांची बऱ्याचवेळा खिल्लीही उडवतो. पण जगात अशी पाच विमानतळं आहेत जिथं विमानात बसायला नाही तर या विमानतळावर उतरायला बडे बडे हादरतात.

paro-bhutan-airport

पारो विमानतळ, भूतान
या विमानतळावरुन विमान आकाशात झेपण्याआधी प्रवाशांना चिंता मुक्त होण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. या विमानतळाची रचना पाहता २०११ मध्ये या विमानतळावरून फक्त Druk एअरलाईन्सच्या विमानाला उडण्याची परवानगी होती.पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या विमानांनाच येथे परवानगी देण्यात येते.

likla-airport-nepal

लुकला विमानतळ, नेपाळ
नेपाळचे लुकला विमानतळ जगातील सर्वात धोकादायक विमानतळ मानले जाते. २००० फूट लांब ओबड धोबड असलेल्या या विमानतळाचे एक टोक भिंतीला लागून आहे. यामुळे विमान लँड करताना वा उड्डाण करताना अपघाताचा कायम धोका असतो. आतापर्यंत या विमानतळाजवळ १३ अपघात झाले आहेत. हेलिकॉप्टर आणि विशिष्ट प्रकारची विमानचं येथे लँड करण्यासाठी सक्षम आहेत.

cariebia-gustav111

गुस्टाफ १११ विमानतळ,कॅरेबिया
जगातील सर्वात भीतीदायक विमानतळांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कॅरेबियन बेटावरचं गुस्टाफ १११ हे विमानतळ आहे. विमानतळाच्या दुसऱ्या टोकाला बीच आहे. या बीचवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यामुळे छोटे विमान व कर्मशियल विमानच येथून उडू शकतात. बऱ्याचवेळा रस्त्यावरून जाणारे पादचारी व वाहनांच्या जवळून ही विमान उडतात.

medira-airport-portugal

मैडीरा विमानतळ, पोर्तुगाल
अत्यंत धोकादायक असं हे विमानतळं आहे. आतापर्यंत या विमानतळावर ३ दुर्घटना झाल्या आहेत. अटलांटीक महासागर आणि डोंगरांनी वेढलेल्या या विमानतळावर हवेचा जोर अधिक असतो. यामुळे ओबड धोबड धावपट्टी, खालून वेगाने वाहणारे पाणी, यातून गदागदा हलणारे विमान हवेत उडवताना पायलटची पुरती दमछाक होते.

greenland-airport

नरसरसुक विमानतळ, ग्रीनलँड

अंटार्टिक प्रमाणे हे विमानतळही बर्फाच्छादित असतें. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेकदा विमानाचं संतुलन बिघडत. धावपट्टीला लागूनच असलेल्या सक्रिय ज्वालामुखीतून निघणारी राख विमानाच्या इंजिनमध्ये गेल्याने विमान उडवणे पायलटसाठी जोखमीचे काम असते.

आपली प्रतिक्रिया द्या