‘या’ वस्तूंमुळे कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका…वाचा सविस्तर…

कोरोनापासून बचावासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि कोरोना रोखण्याबाबतच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या संशोधनातून कोणत्या वस्तूंमुळे कोरोना फैलावण्याचा सर्वाधिक धोका असतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा वस्तूंना स्पर्श न करणे किंवा स्पर्श केल्यास सॅनिटायझरचा वापर करणे आणि हात साबणाने धुणे, यासारखी काळजी घेतल्यास कोरोना संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत होते. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

अनलॉक सुरू झाल्याने आता प्रवासालाही सुरुवात झाली आहे. मात्र, सार्वजनिक वाहनातून जाताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बस,मेट्रो, रेल्वेच्या खिडक्या आणि पोलमुळे कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असतो. काचा आणि स्टीलवर कोरोनाचे विषाणू सहज चिकटत असल्याने तसेच यावर ते बराचवेळ राहत असल्याने संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. बस, रेल्वे, मेट्रोमध्ये चढ-उतार करताना प्रवासी पोलचा आधार घेतात. त्यामुळे त्याला अनेकांचा स्पर्श होतो. त्यामुळे पोल किंवा खिडक्यांना स्पर्श झाल्यास सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

चलनी नोटांद्वारेही कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याचे संशोधकांना आढळले आहे. 20 अंश तापमानात कोरोनाचे विषाणू 28 दिवसांपर्यंत राहू शकतात. त्यामुळे चलनी नोटांमुळेही कोरोना संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.

मोबाईल आजच्या काळात जीवनावश्यक आहेत. मात्र, मोबाईल स्क्रीनवर कोरोना विषाणू सर्वाधिक काळ राहत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. तसेच मोबाईल नेहमी हातात, खिशात किंवा जवळपासच ठेवतो. त्यामुळे मोबाईलची स्क्रीन वेळोवेळी सॅनिटाईज करावी, तसेच मोबाईलचा बराच वेळ वापर केल्यानंतर हात साबणाने धुण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

सध्या रुग्णांलयांमध्ये स्वच्छता राखण्यात येत असून सॅनिटायझेशनही केले जाते. मात्र, रुग्णालयाच्या वेटिंग रुममधून कोरोना संक्रमणाचा धोका असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी गर्दी असते. तसेच विविध प्रकारचे रुग्ण असतात. तसेच तेथील टेबल, खुर्चीसारख्या वस्तू, स्टील, प्लॅस्चीक किंवा काचेच्या वस्तू यामुळे संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळे रुग्णालयात जावे लागल्यास तेथील कोणत्याही वस्तूला स्पर्श करून नये, असे संशोधकांनी सांगितले.

एटीएम मशीनच्या स्क्रीनवर आणि बटनांवरही कोरोना व्हायरस बराच काळ राहू शकतात. त्यामुळे एटीएममुळेही संक्रमणाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांवर भर द्यावा. तसेच एटीएममध्ये गेल्यास हाताला सॅनिटायझर लावावा आणि घरी आल्यावर हात साबणाने धुवावेत. स्टीलच्या वस्तूंवर कोरोना व्हायरस बराच काळ राहू शकत असल्याने घराबाहेर गेल्यावर स्टील आणि लोखंडाच्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे. तसेच घरात आणि कार्यालयात खिडक्या उघड्या ठेवाव्यात. सूर्यप्रकाश आल्यास त्या वातावरणात कोरोना व्हायरस तग धरू शकत नाही. तसेत खेळती हवा असल्यासही कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी घेतल्यास कोरोना संक्रमणाचा धोका कमी करता येतो, असे संशोधकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या