दारूड्या पप्पूच्या आई आणि बहिणीनेच दिली त्याच्या हत्येची सुपारी

35

सामना ऑनलाईन,नाशिक

गेल्या आठवड्यामध्ये ७ मार्च रोजी पप्पू यादव-पाटील नावाच्या एका ४० वर्षांच्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. पप्पू पाटील हा भयंकर दारू प्यायचा आणि दारूसाठीच्या वादातूनच त्याचा कोणीतरी खून केला असावा असा सुरूवातीपासून नाशिक पोलिसांना संशय होता. हा संशय चौकशीअंती खरा ठरला आहे. नाशिक पोलिसांनी पप्पूच्या हत्येप्रकरणी त्याच्या आई आणि बहिणीला ताब्यात घेतलं आहे.

पप्पू रोज दारूसाठी त्याच्या आईकडे पैसे मागायचा. यावरून घरामध्ये रोज भांडणं होत होती. पप्पूची बायकोली त्याच्या दारू पिण्याला कंटाळून घर सोडून गेली होती. घरातील या रोजच्या भांडणाला कंटाळून पप्पूच्या आई आणि बहिणीने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती असं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी पप्पूची सुपारी घेऊन त्याची हत्या करणाऱ्यांचा शोध घ्यायला आता सुरूवात केली आहे.   पप्पूचा मृतदेह  दसक शिवार येथील अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या सायट्रिक इंडिया कंपनीच्या मोकळ्या जागेवर सापडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या