अचानक गाडी आल्यामुळे तरुणीने स्कूटरचा दाबला ब्रेक, ट्रकच्या धडकेत आईचा मृत्यू

आईला कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून चाललेल्या मुलीने समोरून अचानक गाडी आल्यामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे तोल जाउन आई रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्याने ट्रकचालकाने त्यांना धडक दिली. त्यात तरुणीची आई गंभीर जखमी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेनउच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर घडला. पुजा चर्तुवेदी (वय 35) असे मृत्यू  झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वा नउच्या सुमारास आई पुजा चर्तुवेदी यांची मुलगी त्यांना कामावर सोडण्यासाठी दुचाकीवरून चालल्या होत्या. त्यावेळी ज्योती चौक ते एनआयबीएम रस्त्यावरील मेमोरी गार्डन सोसायटीजवळील रस्त्यावर अचानक वाहनचालक समोरून आला. त्यामुळे तरूणीने दुचाकीचा ब्रेक दाबल्यामुळे पुजा यांचा तोल जाउन रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली पडल्या. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे पूजा यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. के. सोनवणे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या