हुंड्यासाठी छळ झाल्याने विवाहितेची आत्महत्या, पती व सासूला अटक

432

श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या अतिथी कॉलनीतील विवाहितेने सासूच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासू यांना पोलिसांनी अटक केली

अतिथी कॉलनीतील प्रियंका विशाल नरोडे या विवाहितेने श्रीरामपुरात सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी हॉटेल टाकण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत म्हणून तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास देवून छळ केलाण तसेच लग्नात एक तोळ्याची अंगठी घातली नाही म्हणून तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून प्रियंकाने तिच्या सासरी लहान मुलाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

याप्रकरणी प्रियंकाची आई वंदना नवनाथ सोनवणे (रा. अंतुर्ली, ता. इंदापूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. १०९९/२०२० प्रमाणे पती विशाल देविदास नरोडे, सासरा देविदास कोंडीराम नरोडे, सासू लता देविदास नरोडे, दीर विकास देविदास नरेोडे यांचेविरुध्द भादंवि कलम ३०४ ब, ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती व सासूस अटक करण्यात आली आहे. यापकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरवडे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या