दुसरी मुलगी झाली म्हणून चिमुरडीला विळ्याने चिरले, बाळाचा मृत्यू  

1263
murder-knife

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरी पण मुलगी झाली म्हणून आईनेच विळ्याने चिरून तिचा खून केला आहे. आरोपीचे नाव मंजू असून तिला अटक केली आहे.

मंजूला 13 फेब्रुवारी रोजी मुलगी झाली. मंजूला आधीही मुलगीच होती. त्यानंतर एकदा गर्भपात झाला होता. दुसरी मुलगी झाली. जेव्हा मंजू बाळासह घरी आली तेव्हा विळ्याने तिने बाळाला चिरले. बाळ जोर जोरात रडायला लागले म्हणून शेजारचे धावत आले. तेव्हा बाळ रक्ताच्या थारोळ्यात होते. कुटुंबीयांनी मिळून बाळाला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंजूच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या