आई ती आईच असते! मुलाला यमाच्या दारातून सुखरुप आणलं, थरकाप उडवणारा Video

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ चर्चेचा विषय बनतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने आई आपल्या बाळासाठी थेट यमाशीही भिडू शकते याचा पुरावाच मिळाला आहे.

आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते. त्याच्या संगोपणासाठी आणि सुरक्षेसाठी ती कोणताही तडजोड करत नाही. सध्या ट्विटरवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून वन अधिकारी सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. जगाला आईची गरज आहे असे कॅप्शन या व्हिडीओला त्यांनी दिले आहे.

काय आहे हा व्हिडीओ?

सुशांता नंद यांनी शेअर केलेली ही व्हिडीओ क्लिप 16 सेकांदाची आहे. एक महिला विटांच्या भिंतीपाशी मुलाला घेऊन बसलेली आहे हे यात दिसते. अचानक या महिलेला काहीतरी विपरीत घडणार आहे याची चाहूल लागते. ती ज्या विटांच्या भिंतीजवळ बसलेली असते ती हलू लागते. भिंत कोसळू नये यासाठी ती उभी राहते आणि भिंतीला हात लावते. मात्र भिंत पडणारच हे लक्षात येते तेव्हा ती मुलाला वाचण्यासाठी दोन्ही हात त्याच्यावर धरते. कोसळणाऱ्या विटा तिच्या पाठीवर पडतात आणि मुलाला साधे खरचटतही नाही. तिथे आणखी एक व्यक्ती येतो आणि विटांमधून मुलाला बाहेर काढतो. मुलाला वाचवण्यासाठी विटांची भिंत आपल्या अंगावर घेणाऱ्या आईला नेटकऱ्यांनी सलाम केला असून तिला ‘सुपरवुमन’ म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या