Mother’s Day – ‘आई’च्या भूमिकेने मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणजे ममता, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय. आईची भूमिका प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची असते मग ती रियल लाईफ असो किंवा रिल लाईफ. चित्रपटामध्ये हिरो आणि व्हीलनची भूमिका जेवढी महत्वाची असते तेवढीच आईची देखील असते. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने आईच्या भूमिका अजरामर केल्या. आज मातृदिनाच्या निमित्ताने मोठा पडदा गाजवणाऱ्या काही अभिनेत्रींबाबत आपण जाणून घेऊया…

अचला सचदेव

achala-sachdev

‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रटात अभिनेत्री काजोल आणि ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका करणाऱ्या अचला सचदेव आपल्याला माहिती असतीलच. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आईच्या भूमिका केलेल्या अचला यांनी ‘ए मेरी जोहरा जबी’ या आयटम साँगमध्येही काम केले होते. 2012 मध्ये त्या काळाच्या पडद्याआड गेल्या.

निरुपा रॉय

nirupa-roy

अमिताभ बच्चन यांच्या बहुतांश चित्रपटामध्ये निरुपा रॉय यांनी त्यांच्या आईची भूमिका साकारली. ‘दिवार’ या प्रचंड गाजलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. 2004 मध्ये त्यांचे निधन झाले.

रिमा लागू

reema-lagoo

राजश्री प्रोडक्शन अंतर्गत निर्मिती झालेल्या बऱ्याच चित्रपटात रिमा लागू आईच्या भूमिकेत दिसल्या. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘मैने प्यार किया’, ‘वास्तव’ या चित्रपटात त्यांनी केलेली आईची भूमिका सर्वांना आवडली. 2017 मध्ये त्यांचे निधन झाले.

स्मिता जयकार 

smita-jaykar

बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरु करणाऱ्या स्मिता जयकार यांना आईच्या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यासारख्या हिट चित्रपटांसह अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी आईच्या भूमिका साकारल्या.

फरीदा जलाल

farida-jalal

एक यशस्वी अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर फरीदा जलाल यांनी निरुपा रॉय यांच्यानंतर आईच्या भूमिका गाजवल्या. ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वांना आवडली. यासह ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहें’ यामध्ये त्यांनी आईची भूमिका केली.

आपली प्रतिक्रिया द्या