एका झटक्यात वाचवा 10 हजार , 108 MP कॅमेराच्या ‘या’ फोनची किंमत झाली कमी

जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Lenovo चा मालकीहक्क असणाऱ्या मोटोरोला कंपनीने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानमध्ये एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला होता. 108 मेगापिक्सल कॅमेरासोबत हा दमदार फोन लॉन्च करण्यात आला होता. अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीत उतरलेल्या या फ्लॅगशिप मोबाईलची किंमत आता कमी झाली आहे. कंपनीने फोनच्या किंमतीमध्ये तब्बल 10 हजार रुपयांची घट केली आहे.

मोटोरोलाने गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये Moto Edge+ हा फ्लॅगशिप स्मार्टफोन हिंदुस्थानच्या बाजारात उतरवला होता. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत त्यावेळी 74 हजार 999 रुपये एवढी होती. मात्र आता जवळपास एक वर्षानंतर कंपनीने या किंमतीमध्ये मोठी घट केली आहे. कंपनीने 10 हजार रुपयांची घट केली असून आता हा फोन 64 हाजर 999 रुपयांना झाला आहे.

moto-edge

फीचर्स

– 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले (पिक्सल रेजोल्यूशन 1080×2340)
– डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
– ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरवर करतो काम
– 2 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज
– 5000 एमएएचची बॅटरी
– इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

moto-edge-camera

कॅमेरा

कंपनीने या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईट अँगल लेन्स आणि 8 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 6 K व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.

moto-edge-new

बॅटरी

या फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली. तसेच हा फोन रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या