काय सांगता! 20,999 चा फोन मिळतोय फक्त 7,999 रुपयांत… असा घ्या ऑफरचा लाभ

तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. Motorola कंपनी आपल्या Moto G 5G या स्मार्टफोनवर एक जबरदस्त ऑफर देत आहे. ऑनलाईन शॉपिंग अॅप फ्लिपकार्टच्या सहाय्याने तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता आणि 20,999 रुपयांचा मोबाईल चक्क 7,999 रुपयांमध्ये मिळवू शकता.

फ्लिपकार्टने Motorola कंपनीच्या Moto G 5G स्मार्टफोनवर एक बंपर ऑफर दिली आहे. Moto G 5G या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनची किंमत 24,999 रुपये आहे. यावर 4000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देण्यात येत असून यामुळे फोनची किंमत 20,999 रुपये होत आहे. यासह फोनवर 13,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. प्रत्येक फोनची एक्सचेंज व्हॅल्यू वेगवेगळी असते, फोन एक्सचेंज करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या फोनबाबत माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर त्याची किंमत ठरते.

यासह तुम्ही हा फोन एचडीएफची बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने ईएआयद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त 1000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल. तसेच फ्लिपकार्टवर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्क्यांहून कॅशबॅकही दिला जाईल. ‘न्यूज 18 हिंदी‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

moto-g-5g

Moto G 5G ची वैशिष्ट्य –

– 6.7 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2520 पिक्सल) डिस्प्ले
– ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 जीपीयू
– स्नॅपड्रॅगन 750जी प्रोसेसर
– 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज

moto-g-5g-camera

कॅमेरा आणि बॅटरी –

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, 8 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 mAh ची दमदार बॅटरीही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या