काय सांगता! 15 हजारांचा स्मार्टफोन 669 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या…

तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर इ-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सध्या अनेक स्मार्टफोनवर मजबूत सूट मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त फीचर्सवाल्या फोनबाबत माहिती देणार आहोत. या फोनवर 4 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट आणि 10 हजार 350 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

फोनचे नाव आहे Moto G30. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड रिअर कॅमेरा, 5000 एमएएचची दमदार बॅटरी, स्टॉक अँड्रॉईड 11 सारखे फीचर्स देण्यात आले आहे. या फोनवर मिळणाऱ्या विविध ऑफर्समुळे हा फोन तुम्हाला अवघ्या 649 रुपयांना पडू शकतो. कसे ते जाणून घेऊया..

Moto G30 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. याची किंमत आहे 14 हजार 999 रुपये. या फोनवर 4 हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. यामुळे तुम्हाला हा फोन 10 हजार 999 रुपयांना मिळेल. तसेच याच फोनवर 10 हजार 350 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत असून तुमच्याकडे जर जुना फोन असेल आणि त्या फोन संपूर्ण एक्सचेंज किंमत मिळत असेल तर तुम्हाला नवा फोन अवघ्या 649 रुपयांना मिळेल. अर्थात फोनची एक्सचेंज किंमत ही स्मार्टफोनची स्थिती काय आहे यावर अवलंबून आहे.

moto

दरम्यान, हाच फोन तुम्ही विना व्याजासह हप्त्यावरही खरेदी करू शकता. आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्डने तुम्ही पेमेंट करणार असाल तर 500 रुपयांची सूटही तुम्ही मिळवू शकता. तर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास फ्लिपकार्ट 5 टक्के ते अनलिमिटेड कॅशबॅकही देत आहे.

Moto G30 ची वैशिष्ट्य –

moto

– 6.51 इंचाचा एचडी+ (1600×720 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले
– 2 गीगाहर्ट्ज स्नॅपड्रॅगन 662 ऑक्टा-कोर प्रोसेसर
– 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज
– 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड सेन्सर, 2 मेगापिक्सलची मायक्रो व 2 मेगापिक्सलची डेप्थ सेन्सर
– 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000 एमएएचची बॅटरी

आपली प्रतिक्रिया द्या