मोटारसायकलसमोर बिबट्या आडवा आला, दोन पोलीस जखमी

leopard

मोटारसायकलला बिबट्या अचानक आडवा आल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव शिवारातील रस्त्यावर शनिवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शेलार व अजिनाथ खेडकर हे गव्हाणेवाडी चेक पोस्ट येथील दिवसपाळी ड्युटीवर होते. ते दोघे ड्युटी संपवून मोटारसायकलवरून माघारी येत असताना उक्कडगाव शिवारात मोटारसायकलला बिबट्या आडवा आला. यामुळे ते मोटारसायकलरुन पडून जखमी झाले आहेत.

या अपघातात अजिनाथ खेडकर यांना पायास व डोक्यास मार लागला असून नामदेव शेलार यांना खरचटले आहे. बेलवंडी येथील खाजगी रुग्णालयातील उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या