अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ दिल्यास खिसा होणार रिकामा, वाचा काय आहे नियम

3970

केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ केली आहे. नियम तोडणाऱ्यांकडून वाहतूक पोलीस नियमानुसार दंडही वसूल करत आहे. याबाबत जनतेमध्ये मोठा रोषही आहे. परंतु तुमच्या छोट्या छोट्या चुका देखील खिसा रिकामा करू शकतात. आता हेच पाहा ना रस्त्याने वाहन चालवताना आपण सहजपणे अनोळखी व्यक्तीलाही लिफ्ट देतो. परंतु तुम्हाला हे महाग पडू शकते. कारण नियमानुसार हा अपराध आहे.

विनाहेल्मेट बाईक चालवणार्‍या चालकाला मारहाण, पोलिसांविरोधात तक्रार दाखल करा

केंद्राचा नवीन वाहतूक कायदा तूर्तास राज्यात लागू होणार नाही

वाहतूक कायदा 1988 मधील कलम 66 नुसार खासगी वाहनांमध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीची वाहतूक करणे गुन्हा आहे. तुम्ही जर अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिली तर नियमानुसार असे मानण्यात येते की तुम्ही तुमचे खासगी वाहन व्यावसायिकतेसाठी वापरले आहे. मग भलेही तुम्ही त्या व्यक्तीकडून एक रुपयाही घेतला नसला तरीही कायद्यानुसार तो गुन्हा होतो. यासाठी कलम 192 (ए) अन्वये दंड आणि शिक्षेची तरतूदही आहे.

रस्त्याने खासगी वाहनाने जात असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुम्ही लिफ्ट दिली आणि वाहतूक पोलिसाने पकडले तर तुम्हाला दंड होऊ शकतो. या गुन्हात तुम्हाला 2 ते 5 हजारांपर्यंत दंडाची रक्कम मोजावी लागणार आहे. तसेच असाच गुन्हा पुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आलेली आहे.

या स्थितीत गुन्हा नाही
एखाद्या रुग्णाला किंवा एमर्जन्सी (अपघात)च्या वेळी खासगी वाहनाचा वापर अनोळखी व्यक्तींसाठी केल्यास तो गुन्हा असणार नाही. परंतु सात दिवसात अशा प्रकारची माहिती तुम्हाला स्थानिक वाहतूक कक्षाला देणे बंधनकारक आहे.

मुंबईत घडला प्रकार
मुंबईत नितीन नायर नावाच्या एका व्यक्तीने खासगी वाहनामध्य तीन व्यक्तींना लिफ्ट दिली होती. पोलिसांनी त्याला पकडले असता त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला. नो पार्किगमध्ये असल्याने आपल्याला दंड ठोठावण्यात आला असे नितीनला वाटले मात्र हा दंड अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिल्यामुळे झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. वाहतूक पोलिसांनी त्याला कलम 66/192 अन्वये 1500 रुपयांचा दंड ठोठावला होता. ‘जनसत्ता‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या