मोटार सायकलींची समोरासमोर धडक ; एक ठार, एक जखमी

accident-common-image

सामना प्रतिनिधी । पानगाव

येथे दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातातमध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पानगाव येथे रात्री ९.३० च्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. (एम.एच.२४.एझेड ८४३१) या मोटारसायकलवर अशोक वैजनाथ पेद्दे (वय ३२) हे जात होते. त्याचवेळी एम.एच.२४- के ३९४५ या मोटारसायकलवरुन दीपक हरिश्चंद्र जगताप रा. नवकुड झरी ता.चाकूर हा युवक येत होता. तो मुसळेवाडीला जात होता. दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अशोक पेद्दे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दीपक जगताप याला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.