मोटरसायकल अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर

ओव्हरटेकच्या नादात भरधाव कारने मोटरसायकला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील पती पत्नी जागीच मृत्यू झाला तर कार चालकाना मेयो रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कारमधील इतर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजताच्या सुमारस नागपूर सावनेर मार्गावर पाटणसावंगी जवळ घडली.

मृतकांमध्ये धनराज रघूनाथ विश्वकर्मा ५० व सुनीता धनराज विश्वकर्मा ४५ रा. रिंगरोड वाघोडा, नागपूर व कार चालक राजेश जमुनादास तिवारी ४० रा. होशंगाबाद मध्यप्रदेश यांचा समावेश. या अपघातात कारमधील किशोर रामदास इंगळे व यासमीन शेख यांचा समावेश असून त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नातेवाईकाकडे लग्न कार्य असल्याने धनराज व त्यांच्या पत्नी सुनीता हे सावनेर येथे आले होते. लग्न सोहळा आटपुन ते परत नागपूर येथे जाण्यासाठी निघाले होते. पाटणसावंगी शिवारात भरधाव वेगात असलेल्या कारचा चालक राजेश याने ओव्हरटेकचा प्रयत्न केला. यात मोटरसायकला मागुन जोरदार धडक बसली. यात मोटरसायकल बऱ्याच दुरपर्यत घासत गेली, तसेच कार चालक राजेश याचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कारने सुध्दा पलटया खाल्ल्या. यात मोटरसायकल वरील धनराज व सुनीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार चालक राजेश या गाडीचा काचातुन बाहेर फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या