अ‍ॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शोकसभा

युवासेनेच्या सचिव अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गिरगाव येथील आर्यन हायस्कूल येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दुर्गा यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कुटुंबीयांसह शिवसैनिक-युवासैनिक भावुक झाले. शिवसेना आणि युवासेनेच्या प्रत्येक आंदोलनात दुर्गा सहभागी व्हायच्या. महाविकास आघाडीच्या ठाणे येथील जनप्रक्षोभ मोर्चामध्येदेखील त्यांचा सक्रिय सहभाग होता, अशी आठवण यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितली.

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीने विभागप्रमुख संतोष शिंदे आणि महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर यांनी शोकसभेचे आयोजन केले होते. शिवसेना सचिव- खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, अमोल कीर्तिकर, राजकुमार बाफना, उपनेत्या मीना कांबळी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस सचिव नरेंद्र राणे, महिंद्र पानसरे, युवासेनेचे अॅड. धरम मिश्रा, साईनाथ दुर्गे, अंकित प्रभू, पाटील, प्रमोद सावंत, माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, अरविंद भोसले, नरवणकर, सुनील नरसाळे आदींनी आदरांजली वाहिली. शिवसेना नेते अरविंद सावंत व शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी पाठवलेल्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले.