Video – ‘मिशा’ असलेल्या महिलांची जाहिरात व्हायरल का होत आहे ?

6356

काही महिन्यांपूर्वी विदेशात एक मोहीम सुरू झाली होती. दाढी-मिशा काढू नका उलट त्यांची निगा राखा अशी ही मोहीम होती. अनेक पुरुषांनी या मोहिमेला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला होता. या मोहिमेचे लोण हिंदुस्थानातही पसरले होते, ज्यामुळे दाढी राखणाऱ्या पुरुषांचा ट्रेंड सुरू झाला होता. सिनेविश्वापासून क्रिकेटजगतापर्यंत सगळीकडे दाढी राखणारे पुरुष दिसायला लागले होते. मोव्हेंबर असं या मोहिमेचं नाव ठेवण्यात आलं होतं. ‘बिली’ नावाच्या रेझर कंपनीने हीच मोहीम आता महिलांसाठीही राबवण्याचे ठरवले आहे. यासाठीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये मुद्दाम मिशा असलेल्या महिलांना घेण्यात आलं आहे.

या जाहिरातीद्वारे मिशा असलेल्या महिलांना संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की ‘महिलांनो मिशा काढू नका, उलट त्या उगवू द्या,त्यांची नीट निगा राखा’ या व्हिडीओमध्ये ज्या महिला दाखवण्यात आल्या आहेत त्या अभिमानाने मिशा मिरवताना दिसत आहेत. डार्क लिपस्टीक लावून मिशा ठळकपणे दाखवण्याचा, त्या नीट विंचरताना त्या मिशांना जेल लावताना महिला व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. वॅक्सच्या पट्ट्या तसेच रेझर फेकून देतानाही महिला या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. अशा पद्धतीने बिली हा पहिली रेझर उत्पादन करणारी कंपनी ठरली आहे, जिने महिलांसाठी मोव्हेंबर मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा दुहेरी उद्देश आहे पहिला म्हणजे महिलांनाही मिशा असतात हे जगाने मान्य करावे आणि दुसरा म्हणजे कॅन्सरग्रस्तांसाठी निधी उभारणे. यापूर्वी या कंपनीने काखेतील तसेच गुप्तांगावरील केस राखण्यात हरकत काय आहे असा प्रश्न विचारत मोहीम राबवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या