भाग्यश्रीच्या ‘जननी’चा ओटीटीवर प्रीमियर

आईच्या मातृत्वाची कथा सांगणारा ‘जननी’ चित्रपटाचा 29 मे रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. ‘जननी’ची कथा मातृत्व, नातेसंबंध, कौटुंबिक बंध जोडणारी आहे. यामध्ये अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, मोहनीश बहल, आयेशा झुल्का, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केले आहे. अलीकडेच मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते.