नागराज मंजुळे बनवणार छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट, शिवत्रयीची घोषणा

1255

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. आज शिवजयंती निमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून ही घोषणा केली आहे.

रितेश देशमुख, अजय अतूल आणि नागराज मंजुळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून शिवत्रयी घेऊन येत आहोत असे नागराज यांनी जाहीर केले आहे. शिवाजी, राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी असे या चित्रपटांची नावे असणार आहेत. आज शिवजयंतीनिमित्त हे जाहीर करताना आपल्याला अत्यानंद होत असल्याची प्रतिक्रिया नागराज मंजूळे यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या