सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या, पोलिसांनी ‘कंडोम’च्या मदतीने केली गुन्ह्याची उकल

मध्य प्रदेशमधील भिंड येथे पोलिसांना बलात्कार आणि हत्या प्रकरणाची उकल करण्यात यश आले आहे. कंडोमच्या मदतीने पोलीस तीन आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांना बेड्या ठोकल्या

कैमोखरी गावातील एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर महिलेचा मृतदेह एका पोत्यात घालून खड्ड्यात फेकून देण्यात आला होता. 17 जूनला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिकांना आढळला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोत्याचे तोंड दोरीने बांधलेले होते. मृतदेह सडलेला असल्याने महिलेची हत्या काही दिवसांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अज्ञात लोकांविरुद्ध हत्या व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र मृत महिलेची ओळख पटली नसल्याने आरोपींपर्यंत कसे पोहोचावे हा सवाल पोलिसांपुढे होता. मात्र महिलेचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तेथेच एक कंडोम आढळून आले. कंडोमच्या बॅचवरून ते सरकारी रुग्णालयातून परिवार नियोजनासाठी वाटण्यात आल्याचे समोर आले.

अधिक चौकशीदरम्यान पोलिसांना महिलेची ओळख पटवण्यातयश आले. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याचे माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. तसेच श्याम नावाच्या एका तरुणावर नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी श्यामला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो पोपटासारखा बोलू लागला.

श्यामने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याचे साथिदार अंकित आणि विक्की यांनाही अटक केली. तसेच हत्याकांडात वापरलेली दुचाकीही जप्त केली. हत्येनंतर आरोपींनी महिलेचा मोबाईल ओएलएक्सवर विक्री केल्याचेही समोर आले.

आपली प्रतिक्रिया द्या