मध्य प्रदेश सरकारमधील मंत्र्यांचे काँग्रेस उमेदावाराच्या पत्नीबद्दल वादग्रस्त विधान

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महिलेबद्द्ल वादग्रस्त विधान केले होते. आता राज्याच्या एका मंत्र्याने काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबद्दल अभद्र शब्द वापरून वादग्रस्त विधान केले आहे.

मध्य प्रदेशमधील अनूपपूरचे भाजप उमेदवार बिसाहू लाल साहू यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार विश्वनाथ सिंह उभे आहेत. सिंह यांनी उमेदवारी अर्जात पहिल्या पत्नीची माहिती दिलेली नाही. यावर भाजप उमेदवार आणि मंत्री साहू  यांनी अभद्र भाषा वापरत वादग्रस्त विधान केले आहे.

या प्रकरणी काँग्रेस नेते विश्वनाथ सिंह म्हणाले की साहू यांनी चुकीचे विधान केले आहे कारण ते निवडणूक हरणार आहेत. 15 वर्षापूर्वी माझे लग्न झाले असून आपल्याला 2 मुले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच साहू यांच्या विरोधात आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या