मध्य प्रदेशातील खांडवामध्ये कावड यात्रेवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

MP-RIOT

सोमवारी मध्य प्रदेशातील खांडवा येथे कावड यात्रेच्या उत्सवादरम्यान दगडफेक झाल्याचं वृत्त पसरताच दंगल उसळली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला.

एका धार्मिक संस्थेने काढलेली कावड यात्रा खांडवा येथील कहारवाडी परिसरातून जात असताना ही घटना घडली.

शहरातील प्रमुख मार्गांवरून यात्र अगदी शांततेत सुरू होती. कहरवाडी येथे पोहोचताच दगडफेकीची घटना घडली आणि काही वेळातच गोंधळ उडाला. त्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये, संरक्षक पोशाख घातलेले पोलीस काही लोकांवर लाठीचार्ज करताना दिसत आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेदरम्यान एका वाहनाचे नुकसान झाले असून यामागे असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल.

जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आणि लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका असे आवाहन केले आहे.

त्याचवेळी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर पोलीस दंगलीचे व्हिडीओ फुटेज स्कॅन करत आहेत.