‘मरता मरता वाचले’, आयसीयूमधून बाहेर आल्यावर खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

2859

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात आले होते. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात ठेवण्यात आले. अतिदक्षता विभागातून बाहेर आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

‘आज मला अतिदक्षता विभागामधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले. आता माझी प्रकृति थोड़ी स्थिर आहे. मी मरता मरता वाचले. कुठे न कुठे तरी आपल्या चांगल्या कर्माचे फळ मिळते. तसेच आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. लवकर बरी होऊन मी पुन्हा जनसेवेसाठी सज्ज होणार’, असे नवनीत राणा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा, पती रवी राणा यांच्यासह कुटुंबातील 12 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर 6 दिवस उपचार सुरु होते. मात्र त्रास अधिक वाढल्याने त्यांना नागपूरच्या ओकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे श्वसनाचा आणि फुफ्फुसाचा त्रास अचानक वाढल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या