खासदार नवनीत राणा आणि पती आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण

1076

काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांच्या कुंटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता राणा दाम्पत्याची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे.

मंगळवारी नवनीत राणा यांच्या दोन मुलांसह कुटुंबातील 10 सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. पण राणा दाम्पत्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण आज दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आमदार रवी राणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सहाय्यकाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना मुंबईत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. राणा मुंबईहून परतल्यानंतर त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळली.  सुरूवातीला नवणीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यात लक्षणे दिसत नव्हती. पण आज त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राणा यांचे निवासस्थान आणि आजुबाचा परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. तसेच राणा दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या