खासदार नवनीत राणा यांच्या दोन मुलांसह 10 सदस्यांना कोरोनाची लागण

1499

खासदार नवनीत राणा यांच्या दोन मुलांना आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली नाहिये.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात त्यांच्या दोन मुलांचाही समावेश आहे. रवी राणा यांच्या वडिलांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. तेव्हा 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. त्यात रवी राणा यांच्या मातोश्री, त्यांची दोन मुले, बहीण त्यांचे पती आणि इतर नातेवाईकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सुदैवाने राणा दाम्पत्यांन कोरोनाची लागण झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या