अतिवृष्टीमुळे घर वाहून गेलेल्या निराधार अंध दांपत्याला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा मदतीचा हात

मागील तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा तूळ येथे अर्जुन शिवाजी मस्के व त्याच्या पत्नी हे एक निराधार अंध दाम्पत्य राहत होते. या अतिवृष्टीमध्ये या दाम्पत्याचे घर वाहून गेले होते. अशा निराधार दाम्पत्यावर असे संकट कोसळल्याने धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱयावर असताना या कुटुंबियांची भेट घेऊन त्याला आधार दिला होता. यामध्ये त्यांना लवकरात लवकर मदतीचे आश्वासन खासदार राजेनिंबाळकर यांनी दिले होते.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने त्या निराधार दाम्पत्याला शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी यांच्या हस्ते रोख 20 हजार रुपये आर्थिक मदत करून आधार देण्यात आला. याप्रसंगी अर्जुन मस्के यांच्या वतीने खासदार राजेनिंबाळकर व शिवसेनेचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, धाराशिव तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, तुळजापूर उपतालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, धाराशिव विभागप्रमुख सौदागर जगताप, चेतन बंडगर, अमिर शेख, सिद्राम कारभारी, महादेव पवार यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या