पूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करा, खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

679

पुरामुळे स्थानिक व्यापाऱयांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील व्यापाऱयांचा जीएसटी रद्द करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नाशिक, वसई, विरार आणि पालघर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे हजारो घरे, दुकाने, कार्यालये, गोदामे आणि कारखाने यांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या हजारो दुकानदार आणि व्यापाऱयांच्या मालाचे नुकसान झाले. पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी या दुकानदार आणि व्यापाऱयांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

25 लाखांची मदत करणार
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या खासदार निधीतून 25 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली आहे. यासंदर्भात खासदार शेवाळे यांनी जिल्हाधिकाऱयांना एक पत्र लिहून विनंती केली आहे. तसेच गेल्या आठवडय़ात हजारो बिस्कीटचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्याही खासदार शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या माध्यमातून पूरग्रस्त भागांत वितरित करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या