Video – लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर खासदारांनी फेकली कागदपत्रं, सभागृह काही काळासाठी तहकूब

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर संसदेत काँग्रेससह विरोध पक्ष आक्रमक स्थितीत पाहायला मिळाले. विरोधी पक्षातील खासदार आज देखील काळ्या कपड्यांमध्ये संसदेत दाखल झाले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याविरोधात संतप्त खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर कागदपत्रे फेकल्याने आणि पत्रके फोडल्याने लोकसभेचे अधिवेशन मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. ही घटना संसदेच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.