मृण्मयीचा ‘डियर फादर’सोबत सेल्फी

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी सिनेसृष्टीतील नवोदित अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेने नुकतंच सोशल मीडियावर अभिनेता परेश रावल सोबत एक छान सेल्फी तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे आणि त्या सेल्फीला तिने ‘डियर फादर’ अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या कॅप्शनने बरेच चाहते मात्र गोंधळले.

या फोटोमागची खरी गोष्ट अशी की, मृण्मयी अभिनेता परेश रावल सोबत एका गुजराती नाटकात अभिनय करतेय आणि त्या नाटकाचं नाव ‘डियर फादर’ असं आहे. या नाटकाचे जवळ जवळ ५०० प्रयोग झाले असून या नाटकासाठी मृण्मयीने भारतभर तसंच अमेरिका,लंडन, दुबई, सिंगापुर, नैरोबी या ठिकाणी दौरे केले. मृण्मयी या नाटकात परेश रावल यांच्या सुनेची भूमिका सादर करतेय आणि तिच्या नाटकातील फादर-इन-लॉसोबत एक कूल सेल्फी तिने तिच्या लाडक्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटो इतकीच या दोघांची ऑन स्टेज केमिस्ट्री पण तितकीच चांगली असेल यात शंकाच नाही.