
हिंदुस्थान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच धोनीने त्याच्या पत्नीसह उत्तराखंडमधील वडिलोपार्जीत घर असलेल्या गावाला तब्बल वीस वर्षाने भेट दिली. यावेळीचे काही निवांत क्षण कॅमेऱ्यात टिपले होते. साक्षीने ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल होत आहेत.
साक्षी सिंहने उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात असलेल्या नयनरम्य लवाली गावात पोझ देताना त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.पहिल्या छायाचित्रात हे जोडपे लवली येथील रंगीबेरंगी घराच्या उंबरठ्यावर बसलेले दिसत आहे. साक्षीने घर दर्शविणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. याला 1 लाखांहून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
धोनी प्रचंड फॉलोअर्स असूनही तो सोशल मीडियावर क्वचितच काहीही पोस्ट करतो. अनेक चाहत्यांनी फोटो शेअर केल्याबद्दल पत्नी साक्षीचे आभार मानले तर काहींनी उत्तराखंडमध्ये त्यांचे स्वागत केले.
धोनीने कुटुंबासह त्याचे कुलदैवत गुरु गोरखनाथजी यांचेही दर्शन घेतले.यावेळी आजूबाजूच्या गावातील लोकांनी धोनीला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
गावातील तरुणांनी धोनीसोबत सेल्फी काढला.यापूर्वी 2003 मध्ये महेंद्रसिंग धोनी आपल्या पवित्र धाग्याच्या सोहळ्यासाठी गावात आला होता.
एम एस धोनीच वडिलोपार्जित असलेले घर. महेंद्रसिंग धोनीच्या गावात आगमनाने लोकांमध्ये विकासाची आशा निर्माण झाली आहे. विमानतळावर अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर ते कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसह त्यांचे मूळ गाव लवली येथे पोहोचले. धोनीसोबत त्याचा चांगला मित्र सीमांत लोहानीही उपस्थित होता.