आयपीएलमध्ये महेंद्र सिंग धोनीचा नवा विक्रम

35

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडिअममध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात टॉस उडवल्यावर धोनी आयपीएलमध्ये सलग दीडशे वेळा कर्णधार राहणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या एकूण आठ सिझनमध्ये धोनीने चेन्नई संघाचा कर्णधार होता. तसेच आयपीएलमधून चेन्नई संघाला बाहेर काढल्यावर धोनी दोन सिझनमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट या संघाचा कर्णधार होता.

आयपीएलच्या एकूण आठ सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग संघाने कर्णधार महेद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दोनदा आयपीएलचे अजिंक्यपद पटकावले आहेत. तसेच सहा वेळा आयपीएलचा उपविजेचा संघ राहिला आहे. धोनीने कर्णधार म्हणून प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याचप्रमाणे त्याने फलंदाजीही जबरदस्त केली आहे. आयपीएलच्या गेल्या एक-दोन सिझनमध्ये धोनीचा फॉर्म हरवला होता. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी तुफानी फलंदाजी करत आहे.

क्रिकेट सामन्यांमध्ये धोनीला ‘बेस्ट फिनीशर’ म्हणून ओळखले जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध झालेला सामन्यात नाबाद ७९ धावा करत सामना जिंकून दिला. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे या सिझनमध्ये धोनीने एकूण सात सामन्यात ५८.७४ सरासरीने २३५ धावा केल्या आहेत.

आयपीएल संबंधीत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आपली प्रतिक्रिया द्या