धोनीच्या राजकुमारीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

41

सामना ऑनलाईन । मुंबई

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची नन्ही परी झिवा सध्या सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाली आहे. झिवाचा आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्राम पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये झिवा भगवान श्री कृष्णाचे मल्ल्याळम भाषेतील भजन गाताना दिसत आहे.

धोनीसोबत छोट्या झिवाचा खट्याळपणा कॅमेऱ्यात कैद

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या हा व्हिडिओ काही तासात लाखो लोकांनी पाहिला आहे. झिवाच्या गोड आवाजातील या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. याआधीही झिवाचे अनेक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाले आहेत. धोनीसोबत छोट्या झिवाचा खट्याळपणा कॅमेऱ्यात कैद करणारे काही गोड व्हिडिओ हे या आधीही व्हायरल झाले आहेत.

@mahi7781 @sakshisingh_r ❤️❤️

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

आपली प्रतिक्रिया द्या