‘हा’ व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही कराल धोनीच्या देशभक्तीला सलाम

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन

हिंदुस्थान व न्यूझीलंडमध्ये झालेल्या तिसऱ्या व निर्णायक सामन्यात हिंदुस्थानचा चार धावांनी पराभव झाला. हिंदुस्थानचा भरवशाचा फलंदाज महेंद्रसिंग धोनी अक्षरश: दोन धावांवर बाद झाला. धोनीने फलंदाजीने जरी चाहत्यांचे मन जिंकले नसले तरी त्याने मैदानावर दाखविलेल्या देशभक्तीने लोकांनी त्यांची स्तुती केली आहे. धोनीच्या या देशभक्तीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महेंद्र सिंह धोनी याचे हिंदुस्थानात भरपूर चाहते आहेत. मात्र आज न्यूझीलंडमध्ये सामन्यादरम्यान एक चाहता हातात हिंदुस्थानचा झेंडा घेऊन थेट मैदानात उतरला व त्याने धोनीकडे धाव घेतली. धोनी समोर आल्यानंतर त्याने धोनीच्या पाया पडायला सुरुवात केली. चाहता खाली झुकल्यामुळे त्याच्या हातातील हिंदुस्थानचा झेंडा धोनीच्या पायाजवळ आला. धोनीने लगेचच झेंडा हातात घेत तो बाजूला झाला. धोनीने हिंदुस्थानी झेंड्याप्रती दाखवलेला आदर पाहून कॉमेंटेटरने देखील त्याची स्तुती केली. नेटकऱ्यांनी देखील धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ : 

 

आपली प्रतिक्रिया द्या