
बर्ड फ्लूचा कहर संपूर्ण देशात वाढत असून अनेक राज्यांमध्ये याचा प्रसार वेगाने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, मध्य प्रदेशच्या झाबुआ येथील कडकनाथ कोंबड्यांमध्ये याचा प्रसार सर्वाधिक झाला असल्याचे समोर आले आहे. यामध्ये क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी याने झाबुआच्या एका पॉल्ट्री फॉर्म दिलेल्या ऑर्डरमधील 2000 कोंबड्यांचाही समावेश आहे.
झाबुआतील प्रसिद्ध आशीष कडकनाथ फार्मला देखील बर्ड फ्लूचा फटका बसला आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी याने या फार्मला 2000 कोंबड्यांची आर्डर दिली होती मात्र हे सर्व कोंबडे बर्ड फ्लूचे शिकार झाले.
आता 15 दिवस अगोदरच फार्मवर कडकनाथ कोंबड्यांची मोठी संख्या होती आणि पूर्ण फार्म भरला होता. मात्र आता हे फार्म जवळपास रिकामं झालं आहे आणि संचालक विनोद मैडा यांना मोठं नुकसान सोसावे लागत आहे.
या फार्मवर धोनीने 2000 कोंबड्यांची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर डिसेंबरमध्येच दिली जाणार होती. मात्र त्या महिन्यात पाऊस झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली. गेल्या 7 दिवसांपासून रोज 300 ते 400 कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे समोर आले. त्यानंतर 800 कोंबड्यांना मारून त्यांना पुरण्यात आले.