शमी सभ्य गृहस्थ, तो धोका देणार नाही!

48

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पत्नी हसीनने केलेल्या गंभीर आरोपामुळे ‘टीम इंडिया’चा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची क्रिकेट कारकीर्द टांगणीला लागली आहे, मात्र या अडचणीच्या काळात ‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शमीचे सासरे यांनी त्याला समर्थन दिले आहे.

धोनीने शमीचे समर्थन करत म्हटले की, ‘तो एक सभ्य गृहस्थ आहे. पैशांसाठी पत्नीला अणि देशाला धोका देणारा तो माणूस नाही.’ तसेच धोनीने यावर अधिक काही बोलण्यास नापसंती दर्शवली. धोनी म्हणाला, ‘या सर्व गोष्टी शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित असल्यामुळे मी यात अजून काही बोलू इच्छित नाही.’ शमीचे सासरे मोहम्मद हसन यांनीही मुलीची बाजू घेतली नाही. ते म्हणाले, ‘हसीन आणि शमीतील भांडणाची कारणे कुटुंबातील आम्हा क्यक्तींना माहीतच नाहीत. थेट प्रसारमाध्यमांमार्फतच आम्हाला या साऱ्या गोष्टी कळल्या.’

आपली प्रतिक्रिया द्या