आरोपांमध्ये फसलेल्या शमीचा धोनीकडून बचाव

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पत्नीच्या आरोपांमुळे वादात अडकलेल्या हिंदु्स्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या बचावासाठी एस.एस. धोनी धावला आहे. धोनीने शमीचे समर्थन केले असून तो एक अत्यंत चांगला व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. शमी सारखा माणूस आपल्या पत्नीला आणि देशाला धोका देणे अशक्य आहे, असे धोनी शमीच्या बचावादरम्यान म्हणाला.

चर्चेतून तोडगा काढण्यासाठी शमी तयार

शमीवरील आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला की, मी या प्रकरणावर जास्त काही बोलणे योग्य नाही, कारण हा त्यांच्या कुटुंबाचा वैयक्तीक प्रश्न आणि आणि शमीच्या जीवनाशी जोडलेला आहे. मात्र मला माहीत आहे शमी एक चांगला व्यक्ती, माणूस आहे.

याआधी शमीची पत्नी हसीनने त्याच्या मेसेज चॅटिंगचे फोटो मीडियासमोर मांडले होते. शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप हसीनने केला होता. हसीनने शमीविरोधात कोलकातातील लाल बाजार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शमी आणि त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांवर कलम ४९८ए, ३२३, ३०७, ३७६, ५०६, ३२८ आणि ३४ अंतर्गत गुन्ह दाखल केला आहे. शमीवर कौटुंबीक हिंसाचाराचा आरोप आहे.

आयसीसी करारातून बाहेर
पत्नीने शमीवर केलेले आरोप गंभीर असल्याने बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या करारप्रणालीमध्ये शमीला स्थान देण्यात आले नव्हते. तसेच शमीच्या आयपीएल खेळण्यावर संशय निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या