महावितरणने घेतला पावसाचा धसका; अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालय न सोडण्याचे आदेश

सामना प्रतिनिधी । मुंबई

पाऊस आणि वीजपुरवठा खंडीत होणे हे नेहमीचं समीकरण आहे. पावसाळ्य़ाच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त घडतात. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचं खापर हमखास वीज कंपनीवर फोडलं जात. याचाच धसका महावितरणने घेतला आहे.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच वीजपुरवठा अखंड सुरू राहावा यासाठी २४ तास अलर्ट राहण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या