पिळदार शरीरयष्टीचा मॉडेल गौरव अरोरा ‘गौरी’ झाला, हॉट फोटो व्हायरल

3015

टीव्ही रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सव्हिला’च्या आठव्या सीझनमध्ये सहभागी झालेला गौरव अरोरा याला सर्वच ओळखतात. पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या या माचो मॅनला शोमध्ये सर्वांनीच आकर्षित करून घेतले होते. परंतु आता तुम्ही या गौरवला ओळखूही शकणार नाही, कारण आता गौरव ‘तो’ नाही तर ‘ती’ झाला आहे.

गौरव अरोरा याने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया केली असून आता तो ‘गौरी’ झाला आहे. सिक्ल पॅकमध्ये दिसणारा गौरव आता सुंदर तरुणीच्या रुपात दिसत असून त्याची ओळखही पटत नाहीय. ‘स्प्लिट्सव्हिला’ या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याने आपल्याला मुलं आवडत असल्याचे खुल्लमखुल्ला सांगितले होते. आपण समलैंगिक असल्याचे त्याने स्वीकारले होते. या शोमधून बाहेर आल्यानंतर त्याने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया केली आणि गौरवचा गौरी झाला.

गौरी झाल्यानंतर तो खूपच सुंदर दिसत आहे. लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया केल्यानंतर ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडल’ या रिअॅलिटी शोमध्ये तो दिसला होता. या शोमध्ये त्याने फक्त दोन एपिसोड केले आणि शोमधून बाहेर पडला. आता त्याचे ‘गौरी’च्या रुपातील सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

gaurav-arora2

एका मुलाखतीमध्ये त्याने गौरव ते गौरीदरम्यानचा प्रवास वर्णन केला होता. 12 वर्षाचा असतानाच आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत असे जाणवल्याचे त्याने सांगितले. मुलांचे आकर्षण आणि मुलींच्यासारखे कपडे आवडत असल्याचे त्याने सांगितले. परंतु कुटुंबातील लोकांना काय वाटेल यामुळे आपण तसे काही समोर येऊ दिले नाही, असेही त्याने सांगितले.

gaurav-arora

आपली प्रतिक्रिया द्या