मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज न फेडण्याचे प्रमाण 126 टक्क्यांवर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षा योजना मुद्रा योजनेअंतर्गत दर वर्षी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढ आहेत. परंतु या योजनेचे लाभार्थी कर्ज फेडण्यात मागे पडत आहेत. गेल्या एक वर्षात मुद्रा योजनेचे कर्ज न फेडण्याचे प्रमाण तब्बल 126 टक्के इतके आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार कुठल्याही कर्जाचे हफ्ते 90 दिवसांत न चुकवल्यास त्यास एनपीए समजले जाते. तर इतर संस्थानमध्ये ही मर्यादा 120 दिवसांची आहे. एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 2017 साली 7 हजार 277 कोटी कर्ज फेडण्यात आले नव्हते. 2018-18 वर्षात हे प्रमाण 9 ह्जार 204 कोटी इतके आहे. तर 2019 या वर्षात या रकमेत वाढ होऊन तब्बल 16 हजार 481 कोटी रुपयांचे कर्ज अजून लाभार्थ्यांनी फेडलेले नाही.

1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत मुद्रा योजनेअंतर्गत 3 लाख 11 हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते. एकूण वितरीत कर्जापैकी 2.98 टक्के रक्कम ही अजून परत आलेली नाही.