चीनलाही मागे टाकू; मुकेश अंबानी यांना विश्वास

24
mukesh-ambani

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था येत्या सात वर्षांमध्ये पाच खर्व डॉलरचे लक्ष्य गाठेल असा विश्वास रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला तर २०३० पर्यंत हा आकडा १० खर्व डॉलरपर्यंत पोहचेल, असेही ते म्हणाले. सात वर्षांत जीडीपी दुपटीने वाढेल असे सांगत ते म्हणाले, शतकाच्या मध्यापर्यंत हिंदुस्थान चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल. तसेच हिंदुस्थान जगातील तिसऱया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत आज एचटी लीडरशिप संमेलनात ते बोलत होते.

अंबानी म्हणाले की, १३ वर्षांपूर्वी या व्यासपीठावर मी बोलण्यासाठी आलो होतो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ५०० अब्ज डॉलरएवढी होती. त्यावेळी २० वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 5 खर्व डॉलरचे लक्ष्य गाठेल असे भाकीत आपण केले होते. मात्र देशाच्या प्रगतीचा वेग बघता ते लक्ष्य आपण २०२४ पूर्वीच गाठू असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या