महिलांनी चूल आणि मूलच सांभाळावे, पुरुषांशी बरोबरी करू नये, मुकेश खन्ना यांचे वादग्रस्त वक्तव

शक्तिमान व महाभारत या गाजलेल्या मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिला व पुरुषांची बरोबरी होऊ शकत नाही. तरीही महिला घरातून बाहेर पडून काम करू लागल्याने या ‘मी टू’ वगैरे चळवळी सुरू झाल्या आहेत, असे विचित्र वक्तव्य मुकेश खन्ना यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून नेटकऱ्यांनी त्यांना फटकारले आहे.


फिल्मी चर्चा’ ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले महिलांचे काम घर सांभाळणे. हा मी टू चा प्रॉब्लेम सुरू झाला कारण महिला घराबाहेर पडून काम करायला लागल्या. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या चर्चा करतात.

महिलांना स्वातंत्र्य़ मिळाले तिथूनच खरा प्रॉब्लेम सुरूझाला. यात सर्वात जास्त त्रास होतो घरातील मुलाला त्याला आई मिळत नाही. आया सोबत राहून ते मूल वाढत असतं. सास बहू सिरीयल बघत ते वाढत असते. जेव्हा पासून महिला काम करू लागला तेव्हापासून त्या हेच म्हणत आहेतकी जे पुरुष करेल ते मी करणार पण पुरुष पुरुष आहे व स्त्री स्त्री आहे. महिलांनी घरात राहावे व घरातील काम करावे अशा मताचा मी आहे असे वक्तव्य मुकेश खन्ना यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटकरांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे अनेकांनी त्यांना रियल लाइफ चा विलन ठरवले आहे.

सोनाक्षी सिन्हावर केली होती टीका

काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हावर टीका केली होती. ‘केबीसी’मध्ये रामायणाबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला सोनाक्षी उत्तर देऊ शकली नाही. रामायणात हनुमानाने संजीवनी कोणासाठी आणली? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता, मात्र ती उत्तर देऊ शकली नाही. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. मुकेश खन्ना यांनीही तिच्यावर निशाणा साधताना तिला रामायण आणि महाभारत या मालिका पाहायला हव्यात असा सल्ला दिला होता. पौराणिक कथांबाबत तिला काहीच ज्ञान नसल्याची टीकाही त्यांनी केली होती.

शत्रुघ्न सिन्हांनी केला होता पलटवार

त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी मुकेश खन्ना यांच्यावर निशाणा साधला होता. मला असे वाटते की रामायणाच्या प्रश्नावर उत्तर देता आले नाही म्हणून काही लोक तिच्यावर दात ओठ खात आहेत. परंतु ते स्वतः रामायणाचे तज्ज्ञ आहे का? त्यांना हिंदू रक्षक कोणी बनवले? असा सवालही शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी हिचे कौतुकही केले आहे. ती स्वतःच्या जीवावर स्टार झाली असून मला तिच्यावर गर्व असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या