पुण्याच्या नाट्यगृहातील अस्वच्छतेचा मुक्ताने केला पर्दाफाश

21

सामना ऑनलाईन । पुणे

महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे पण ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात ज्या व्यवस्थित केल्याच जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नाट्यपरंपरा जपण्यासाठी पुण्यात कोथरुडमध्ये बांधलेल्या यशवंत नाट्यगृहातील स्वच्छतागृहांची अवस्था अगदी किळसवाणी झाली आहे. हे धक्कादायक वास्तव नाट्यनिर्माती आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने फेसबुकवर फोटो टाकून सगळ्यांपुढे आणले आहे. फेसबुकवर फोटो टाकून मुक्ताने यशवंत नाट्यगृहाच्या प्रशासनावर सडकून टीका केली आहे.

राज्यातील अनेक नाट्यगृहांमध्ये नागरी सोयी-सुविधांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कलाकारांनी या संदर्भात आवाज उठवला आहे. मुक्तानेही असाच प्रयत्न केला आहे. आता प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार हाच प्रश्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या