मुळा धरण ५० टक्के भरले, नगरकरांना दिलासा

149

सामना प्रतिनिधी । राहुरी

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा सोमवारी शनिवारी दुपारी १३ हजार दशलक्ष घनफुटांच्या पुढे गेला आहे. धरण ५० टक्के भरल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होताना दिसत आहे. शनिवारी दुपारी कोतुळकडून मुळा धरणात १५ हजार २७१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

नगर जिल्ह्याची कृषी पंढरी म्हणुन मुळा धरणाची ओळख आहे. राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबुन असल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा वाढण्याकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत. हरिश्चंद्रगडावर गेल्या १० दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या १ जून ते २२ जुलै या कालावधीत मुळा धरणात ८ हजार दशलक्ष घनफुट पाणी नव्याने दाखल झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या