वाळू माफियांची तलाठी, कोतवाल यांना धक्काबुक्की

22

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरीतील मुळा नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करणाऱ्या तस्करांनी तलाठी आणि कोतवाल यांना धक्काबुक्की केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अट्टल गुन्हेगार सुभाष माळी यास अटक केली आहे.

राहुरीतील बाळागाव नांदुर परिसरामध्ये मुळा नदीपात्रात वाळुची तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. या माहितीआधारे नायब तहसीलदार जीएस तळेकर, बारागाव नादुरचे तलाठी संदीप नेहरकर, कोतवाल रंगनाथ बाचकर यांच्यासह आणखी तीन जार जणांचे पथक मुळा नदीपात्रात उतरले. यावेळी वाळू माफियांनी दादागिरी करत महसूल पथकावर हल्ला केला. वाळू माफियांनी तलाठी आणि कोतवाल यांना धक्काबुक्की केली. तसेच वाळू उपसा करण्याची यंत्रणा घेऊन पळ काढला. मारहाणीप्रकरणी तलाठी नेहरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या