अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या ठार

सामना ऑनलाईन । काबूल

नोबेल पुरस्कार विजेती पाकिस्तानची मलाला युसुफझाई हिच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेला तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्लाह फजल उल्लाह हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. अमेरिकेने गुरुवारी अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात ड्रोन हल्ले केले होते त्यातच त्या हल्ल्यातच मुल्लाहचा खात्मा करण्यात आला. अमेरिकी लष्कराने मुल्लाह मारला गेल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना कळविली आहे. या मुल्लाहवर अमेरिकेने पाच दशलक्ष डॉलरचे बक्षिस ठेवले होते.

मुल्लाह हा पाकिस्तानातील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवर झालेल्या रक्तरंजित दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड होता. डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या या हल्ल्यात जवळपास १५१ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मुल्लाहने २०१२ मध्ये पाकिस्तानात स्त्री शिक्षणाचा प्रचार करणारी विद्यार्थिनी मलाला युसुफझाई हिच्यावर देखील जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात मलाला गंभीर जखमी झाली होती. मात्र त्यानंतर उपचारासाठी तिला लंडन येथे हलविण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या