‘टायगर जिंदा है’ ऐवजी दाखवला भलताच चित्रपट

34

सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खान अभिनित टायगर जिंदा है हा चित्रपट सुपरहिट ठरला असून लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. पण, चित्रपटासाठी उडालेली झुंबड आणि हाऊसफुलच्या गर्दीत एका चित्रपटगृहाने टायगरऐवजी भलताच चित्रपट दाखवल्याची घटना मुंबईत घडली आहे. स्पॉटबॉयईने हे वृत्त दिलं आहे.

ट्युबलाईटच्या अपयशानंतर सलमान आणि त्याचे चाहते एका हिट चित्रपटाची वाट पाहत होते. ती उत्सुकता संपवत टायगरने बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमा केला. त्यामुळे चित्रपटाचं बुकिंग हाऊसफुल झालं होतं. मात्र, सलमानला पाहायला उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये चुकून फुकरे रिटर्न्सचा शो पाहावा लागला. संबंधित शोची वेळ ही टायगरसाठी आरक्षित झाली होती. मात्र, तंत्रज्ञाच्या चुकीमुळे प्रेक्षकांना भलताच चित्रपट पाहायला लागला. अर्थात २० मिनिटांनंतर मल्टिप्लेक्स चालकांना ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्वरित आपली चूक सुधारत सलमानचा चित्रपट लावला.

या दरम्यान, सलमानच्या चाहत्यांनी प्रेक्षागृहात आपली नाराजी व्यक्त करत मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला धारेवर धरलं. कसंबसं त्यांना शांत करत चालकांनी टायगरचा शो सुरू केला आणि प्रेक्षक सलमानला पाहण्यात दंग झाले.

आपली प्रतिक्रिया द्या