चमत्कारच..! पतीच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी महिला झाली दोन मुलांची आई

4208

ब्रिटनमध्ये पतीच्या मृत्यूनंतर तब्बल 10 वर्षांनी महिलेला दोन मुलं झाली आहेत. एंजिलीन लेकी जेम्स असे महिलेचे नाव आहे. तिच्या पतीचे 10 वर्षापूर्वी कॅन्सरने निधन झाले होते. मृत्यूपूर्वी त्याने आपले विर्य जमा करून ठेवले होते आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे महिला दोन वेळा त्याच्या मुलाची आई झाली आहे. पतीच्या विर्यापासून 10 वर्षानंतर यशस्वीपणे मुलांना जन्म देण्याची घटना चमत्कार असल्याचे ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

एंजिलीन आणि क्रिस जेम्स याचा 2007 मध्ये विवाह झाला होता. परंतु 2008 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी क्रिस कॅन्सर या भयानक आजाराने मृत्यू पावला. परंतु मृत्यूपूर्वी त्याने आपले विर्य साठवून ठेवले होते. याचा वापर करून आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे एंजिलीन 2013 मध्ये पहिल्यांदा आई बनली, तर 2018 मध्ये ती पुन्हा एकदा आई बनली. पहिल्या वेळी तिला मुलगा झाला, तर दुसऱ्या वेळी मुलगी झाली.

angeleen2

याबाबत बोलताना एजिलीन म्हणाली की, आम्ही दोघे सुखी कुटुंबाचे स्वप्न पाहात होतो. निधनानंतरही तो बाप बनावा अशी माझी इच्छा होती. आम्ही दोघेही पाच मुलांचे स्वप्न पाहात होतो. त्याची कमी नेहमीच जाणवते असेही ती म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या